वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शासनाने हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत जाहीर करावी

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांची मागणी

वेंगुर्ले.ता.१:नुकतीच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भात शेती नुकसान ग्रस्तांना हेक्टरी १५ हजारांची मदत जाहीर केली. मात्र ही शेतकऱ्यांची चेष्टा असून शेतीला येणार खर्च व इतर गोष्टींचा विचार करता एक गुंठे शेतीला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो यामुळे शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर कमीत कमी हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांनी केली आहे.
ऐन भातकापणीच्या तोंडावर अवकाळी पावसाने या भात शेतीचे प्रचंड नुकसान केले. यामुळे सरकार स्थापनेमध्ये व्यस्त असलेल्या व जनतेचा विसर पडलेल्या शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी एम के गावडे यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आज पाऊस थांबलेला आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या पंचनाम्याची वाट बघण्यापेक्षा हे काही उरलेली भात शेती आहे त्याची कापणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन नुकसानीच्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जिल्ह्यात आज आरोग्याची समस्या भीषण आहे. गेल्या पंधरा दिवसात शाळकरी मुलांचा तापसरीने मृत्यू झाला आहे. हे नक्की कोणत्या तापामुळे होते याची आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वच शाळकरी मुलांची तपासणी करून याचे निदान लवकरात लवकर शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात.
निवडणूका झाल्या आहेत. महायुतीला जनादेश मिळाला आहे. मात्र आज सात दिवस होऊनही सत्ता स्थापनेच्या नुसत्या बोलण्या सुरु आहेत. युतीच्या आपसातील हेवेदाव्यामुळे जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. मागील पाच वर्षात कोणताही विकास न केल्याने मताधिक्य काठावर आले आहे. यामुळे राजकर्त्यांनी कोणाचा मुख्यमंत्री व कोणाचा उपमुख्यमंत्री यात जनतेला किंवा विरोधी पक्षाला कोणतेही सारस्य नाही. लवकरात लवकर या शासनाने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत अन्यथा जनतेचा उद्रेक व्हायला फार वेळ लागणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी असेही श्री गावडे म्हणाले.

\