सावंतवाडी येथे आयोजित किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर…

2

वैश्यवाडयातील झकास व जिमखाना येथील प्रसाद खोरागडे मित्रमंडळ प्रथम क्रमांकाचा मानकरी…

सावंतवाडी.ता,०१: येथे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचा मानकरी वैश्यवाडा येथील झकास मित्र मंडळ व जिमखाना येथील प्रसाद खोरगडे मित्रमंडळ ठरला.तेथील सह्याद्री फाऊंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी काशिनाथ ऊर्फ आपल्या दुभाषी प्रसाद मिसाळ व रोहित पाटील या तिघांना विभागून देण्यात आला.तर तृतीय क्रमांक पार्थ मिसाळ जुनाबाजार व हर्ष निर्गुण खासकीलवाडा हे ठरले.

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त भरवण्यात आलेल्या सावंतवाडी शहर मर्यादित किल्ला तयार करण्याच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण सावंतवाडी येथील देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज येथे शुक्रवारी करण्यात आले.या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला स्पर्धेच्या बक्षीस समारंभ झाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार राजाराम म्हात्रे,गटविकास अधिकारी गजानन भोसले,सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब,संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,परीक्षक सतीश पाटणकर, हेमंत मराठेर जयवंत गवस,संस्थेचे सचिव संतोष सावंत,केतन आजगावकर पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, भूषण आरोसकर,हेमंत मराठे,केतन आजगावकर उपस्थित होते.

 

 

8

4