Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सतीश सावंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 2019-20 मध्ये 80 कोटींचे भातपिक कर्ज
सिंधुदुर्गनगरी ता. 1 :
जुलै व ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याची भातशेती 50 टक्के बाधित झाली होती. त्यानंतर उरलेले पिक कापणी लायक आलेले असताना क्यार वादळामुळे कोसळलेल्या पावसाने भातशेती 100 टक्के बाद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानी मिळण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा. त्याचबरोबर 2019-20 मध्ये भातपिकसाठी जिल्ह्यात 80 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. पिक 100 टक्के बाद झाल्याने शेतकरी घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. परिणामी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करतानाच भातपिकाचे 80 कोटींचे कर्ज माफ करावे, असे निवेदन जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली.
श्री सावंत यांनी दिलेल्या निवेदनात, क्यार जिल्ह्यातील बहुतांश भागातील भातशेती 70 टक्के तर काही ठिकाणी 90 टक्के बाद झाली आहे. तसेच भविष्यात 7 नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्टया कोलमडून गेली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु झाले असलेतरी पंचनामे करणाऱ्या कृषि विभागात यंत्रणा तुटपूंजी आहे. त्यामुळे यासाठी जिल्हाधिकारी यांनी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 ते 60 हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिल्ह्यात असंख्य शेतकरी अल्प भुधारक आहेत. त्यामुळे शासनाने गुंठयामागे नुकसानी जाहिर करावी.
खरीप हंगाम 2019-20 मध्ये जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँका यांचेकडून जिल्ह्यात 80 कोटींचे भातशेती कर्ज वाटप झालेले आहे. यात जिल्हा बँकेने 60 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी आकारिपड, देवस्थान इनाम तसेच दुसऱ्याच्या जमिनित भातशेती करतात. त्यामुळे शेती कसत असलेल्या शेतकऱ्याला नुकसानी मिळावी, अशीही मागणी सतीश सावंत यांनी निवेदनात केली. यावेळी त्यांच्या समवेत बँक संचालक प्रमोद धुरी उपस्थित होते.
…तर जनआंदोल उभारणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भातपिक नुकसानी व भातपिक कर्जमाफी मिळवून देण्यासाठी खा. विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. मात्र, मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सतीश सावंत यांनी दिला.
Download WordPress Themes Nulled and plugins.