आमदार नितेश राणेंना मंत्री करा…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपा बैठकीत मागणीचा ठराव…

कणकवली, ता.०१:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे अशा मागणीचा ठराव आज कणकवली येथील भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल ही त्यांच्या  अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली ही  बैठक संपन्न झाली.
कार्यकर्ता हाच परमेश्वर आहे असे मानणारा भारतीय जनता पक्ष आहे. कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघात  आम.नितेश राणे यांना मिळालेला विजय हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचे फळ आहे.आमदार नितेश राणे यांना यापुढे एक लाखापर्यंत मताधिक्‍य मिळाले  पाहिजे अशा पद्धतीची संघटनात्मक बांधणी करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.असे आवाहन श्री जठार यांनी केले.
 ग्रामपंचायत,सहकारी संस्था पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती पर्यंतची सर्व शक्तिस्थळे भाजप कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निश्चितपणे विजयी करेल. आमदार नितेश राणे यांच्या रूपाने कोकणात आज एक आमदार आहे भविष्य 14 आमदार कोकणातून भाजप पक्षाचे असतील त्यासाठी जिल्ह्यापासून गावपातळीपर्यंत भाजपचा विकासाचा अजेंडा राबवायचा आहे. विधानसभेत प्रत्येक बुथवर काम केलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आभार मानण्याचा ‘थँक्स गिविंग’चा उपक्रम येत्या आठ दिवसात राबवावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद  जठार यांनी कणकवली तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
येथील प्रहार भवनच्या  स्वामी विवेकानंद सभागृहात भाजप कणकवली तालुका कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या समवेत भाजपचे प्रदेश सदस्य काळसेकर जिल्हा चिटणीस जयदेव कदम डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सुरेश सावंत यांचेसह नगराध्यक्ष समीर नलावडे, राजश्री धुमाळे शिशिर परुळेकर, संतोष कानडे संदीप मिस्त्री, प्रज्ञा ढवण, रमेश शेट्ये,भाऊ राणे, महिला तालुका अध्यक्ष गीता कामत, शहराध्यक्ष प्राची कर्पे, संतोष आग्रे, संजीवनी पवार,महेश गुरव,बबलू संतोष पुजारी  बाळा पाटील  विजय चंद्र  सदा चव्हाण वींद्र गायकवाड,मेघा गांगण, संजय कामतेकर , समीर सावंत,बंडू हर्णे,राजन परब,  राजू गावडे, प्रकाश सावंत, बबन हळदीवे, विश्वनाथ जाधव,  राकेश राणे,  सूर्य भालेकर,  संदीप चव्हाण,राजु वरूनकर  बाबू घडी, सुशांत चव्हाण,जय साळकर दींसह  तालुक्यातील  असंख्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्येयवेडे कार्यकर्ते घडविणारे नेतृत्व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आहेत, त्यांनी ध्येयपूर्ती करण्यासाठी ज्या पद्धतीने काम केले. त्यांचा तो महत्त्वाकांक्षी स्वभाव कार्यकर्त्याने अंगी करावा असे आवाहन करतानाच प्रमोद जठार म्हणाले भाजपा पक्ष कार्यकर्त्यांना निश्चितच पुढे जाण्याची संधी देणारा पक्ष आहे. त्यासाठी विकासाच्या आऊटलाईन तयार करून प्रत्येक गावात ढोबळ मानाने कोणती प्रलंबित कामे राहिलेली आहेत याची वर्गवारी करा, विकासाच्या प्रथम क्रमांकाच्या कामांना महत्त्व द्या आणि ती पूर्ण करून जनतेपर्यंत पोचुया. जेणेकरून आज भारतीय जनता पार्टी हा पक्ष जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष आहे.भविष्य तो आणखीन पुढे गेला पाहिजे यासाठी नियोजन बद्ध कार्यक्रम बाखून काम करूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप पक्ष नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला तर आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात घेतले जावे अशा  मागणी ठराव नगरसेवक बंडू हर्णे यांनी मांडला  सर्वानुमते हे दोन्ही ठराव सहमत करण्यात आले.
\