शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडून :नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी…

77
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव, गोठोस साळगाव ,गावाच्या गावांची पाहणी….

कुडाळ ता.०२:

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये साळगाव, माणगाव गोठोस या गावांमधील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. जे अधिकारी भात शेतीचे पंचनामे करण्यासाठी कामचुकारपणा करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे खडे बोल माणगाव खोऱ्यातील भातशेतीचे नुकसान पाहणी दौऱ्यावेळी करायला आलेले श्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. अवकाळी पावसामुळे वाऱ्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होते याकडेही शिक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही म्हणाले.
यावेळी आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, दादा बेळणेकर, प्रमोद जठार,
प्रकाश मोर्ये, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\