Thursday, November 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याओटवणे येथे १९ ऑक्टोबरला भव्य नरकासुर स्पर्धा...

ओटवणे येथे १९ ऑक्टोबरला भव्य नरकासुर स्पर्धा…

सावंतवाडी,ता.०७: ओटवणे-गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने १९ ऑक्टोबरला रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२/- रूपये ( बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक: ५००२/- रुपये ( उमेश गावकर पुरस्कृत), तृतीय पारितोषिक ३००२/- रुपये (महेश गावकर पुरस्कृत), तसेच उत्तेजनार्थ १००२ रुपयांची तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

इच्छुक स्पर्धकांनी शनिवार १८ ऑक्टोबरपर्यंत उदीत गावकर ९०७५५ ७४६५८ आणि प्रथमेश गावकर ७५८८८६३११० यांच्याकडे द्यावी असे आवाहन चौगुलेवाडी मित्रमंडळाचे बबलू गावकर आणि महेश गावकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments