मालवण, ता. ७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव येथे आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूलच्या बाल गट, कनिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षांखालील मुले- ५० मीटर बटरफ्लाय- प्रथम -वेदांत संकेत घाटवळ, द्वितीय- कौस्तुभ नंदादीप चोपडेकर, ५० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय- संकल्प कमलाकर खोबरेकर, सांघिक ४ x १०० मीटर रिले: प्रथम – नेहाल उद्धव राऊळ, वेदांत संकेत घाटवळ, कौस्तुभ नंदादीप चोपडेकर, संकल्प कमलाकर खोबरेकर.
१७ वर्षांखालील मुले – २०० मीटर फ्रीस्टाइल प्रथम- ५० मीटर फ्रीस्टाइल तृतीय- हितेश ज्ञानेश्वर तुळसकर, २०० मीटर फ्रीस्टाइल द्वितीय- ५० मीटर बॅकस्ट्रोक द्वितीय- गणेश नंदादीप चोपडेकर, ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रथम- सुमित नामदेव चोपडेकर.
सांघिक ४ x १०० मीटर रिले- प्रथम- कार्तिक प्रशांत चोपडेकर, सुमित नामदेव चोपडेकर, गणेश नंदादीप चोपडेकर आणि हितेश ज्ञानेश्वर तुळसकर.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



