सिंधुदुर्ग, ता.०७: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश उमेदवारांना परीक्षेसाठी तयार करणे आणि पारदर्शक भरती प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
या मार्गदर्शन वर्गासाठी नाव नोंदवण्यासाठी बँकेने एक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन लवकरात-लवकर आपली नोंदणी करावी.
नोंदणी लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbNu6Lft4lQY_7dnyjvHvws81Ec0RXmr9RSiKhlDC8xe4GIw/viewform?usp=header
हे प्रशिक्षण शिबिर पुढील आठवड्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे सुरू होणार आहे. या मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत-जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडणार आहे. या संदर्भात त्यांनी उमेदवारांना कोणत्याही भरती संबंधित अफवांना बळी न पडता केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले आहे. अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि मेरिटमध्ये स्थान मिळवावे, असे आवाहनही मनिष दळवी यांनी केले आहे.



