Thursday, November 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश... 

कोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश… 

  1. सावंतवाडी, ता. ७: मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संघाने लक्षणीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या संघाने या स्पर्धेत रौप्य मुले व कांस्य मुली अशी दोन पदके पटकावून सावंतवाडीचे नाव उज्वल केले.

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने चमकदार खेळ करत स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या विजयी संघात आदित्य सोनटक्के, प्रतीक मडगावकर, रुद्र वेंगुर्लेकर, जॉय रॉड्रिक्स, शुभम देसाई, जयराम गोडकर, आणि विश्वास पाटील या खेळाडूंचा समावेश होता. मुलींच्या संघाने मिळवले कांस्यपदक

त्याचप्रमाणे, मुलींच्या संघाने देखील उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. तनाज शहा, एलवीरा रॉड्रिक्स, प्राची वर्मा, रुही पावसकर, आणि सिया मेस्त्री यांचा या यशस्वी संघात महत्त्वपूर्ण सहभाग होता.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर, क्रीडा संचालक सी. ए. नाईक, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments