मायकल डिसोजा यांचे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न…
सावंतवाडी ता.०२:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी,या मागणीसाठी आज जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासोबत चर्चा केली.दरम्यान श्री.डिसोझा यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे,कृषिअधिकारी सुधीर पाटील,श्री.पडते,श्री.चव्हाण,पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर,उपसरपंच मनोहर ठिकर,ग्रामपंचायत सदस्य,संदीप गवस,शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते
या पाहणी दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.तसेच कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे श्री.खांडेकर यांनी सांगितले.