कणकवली, ता. ०७ : वरवडे येथे झालेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात किमया पारकर तर मोठ्या गटात विवेक सावंत यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत वरवडे आणि कलमठ गावातील ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील लहान गटात प्रथम क्रमांक किमया पारकर, द्वितीय क्रमांक राही घाडीगावकर तर तृतीय क्रमांक निधी घाडीगावकर यांनी पटकावला.
मोठ्या गटात विवेक सावंत याने प्रथम क्रमांक, आरोही घाडीगावकर हिने द्वितीय तर आयेशा घाडीगावकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण रिया राणे आणि लता पाटील यांनी पटकावले.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष विजय कडूलकर, उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, सहसचिव तेजस पोयेकर, दर्शन पोयेकर यांच्यासह मंडळाचे शरद पोयेकर, शरद लाड, तुषार बुचडे, धनंजय सावंत, स्वप्नील सावंत, संतोष राणे, रविराज कांबळी, सुशांत सावंत, मिलिंद बुचडे, दिपक पोयेकर, अक्षय पोयेकर, सुभाष सावंत, प्रभाकर बुचडे, नरेंद्र कांबळी, संतोष सावंत, नागेश राणे, तृप्ती बुचडे, दिव्या सावंत यांनी मेहनत घेतली.



