हेमांगी तारी तिच्या मृत्यूस तिचा पतीच जबाबदार…

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वडिलांचा आरोप गुन्हा दाखल करण्याची सावंतवाडी पोलिसांकडे मागणी…

सावंतवाडी.ता,०३: हेमांगी तारी तिच्या मृत्यूस तिचा पतीच जबाबदार आहे. तो तिला मद्यधुंद अवस्थेत मारझोड करत होता.त्यामुळे नैराश्येतून कंटाळून तिने आत्महत्या केली.असा आरोप करत शिरोडा केर येथील ग्रामस्थांनी आज पतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली.दरम्यान यावेळी हेमांगी हिचे वडील लक्ष्मण बटा यांच्यासह अन्य नातेवाईकांनी आज येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिले. सावंतवाडी माठेवाडा भागात राहणाऱ्या हेमांगी तारी या विवाहितेने काल विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आज तिच्या माहेरच्या लोकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हेमांगीचा पती शंकर हा आपल्या मुलीला मारहाण करत होता.तसेच वारंवार त्रास देत होता.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
यावेळी अनेक वेळा त्याने आपण असा प्रकार करणार नाही.असे लिहून दिले होते.त्यामुळे आपण गप्प होतो.परंतु अचानक झालेल्या वादानंतर तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले त्यामुळे शंकर तारी यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

\