सिंधुदुर्गातील ख्रिश्‍चन समाजाला कॅथाँलिक पतसंस्था ठरली वरदान…

77
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बिशप.आँल्विन बरेटो; संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज हा गरीब म्हणून ओळखला जात होता,मात्र आज या समाजाला कॅथाँलिक पतसंस्थेच्या रूपाने वरदान मिळाले.त्यामुळेच आज समाजाची आर्थिक उन्नती वेगाने झाली आहे,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डायोसिसचे रा.रेव्ह.बिशप.आँल्विन बरेटो यांनी आज येथे केले.कॅथॉलिक अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा.लि,सावंतवाडीच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त येथील नवसरणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचे उदघाटन बिशप.बरेटो यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते.दरम्यान या कार्यक्रमाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी फादर.फिलिप डीसोजा,फादर.अलेक्स डिमेलो,फादर.मनवेल डिसिल्वा,फादर जोग्रीस,फादर अंडरू डिमेलो,फादर ज्यो फर्नांडिस,फादर जॉन सालढाणा,फादर सॅबी डिमेलो,फादर कॅजीटन डीसोजा,फादर साल्वादोर फर्नांडिस,फादर ऑलवीन गोंसालविस,सर व्यवस्थापक जेम्स बोर्जिस,चेअरमन पी.एफ.डोन्टस, संचालक मार्टिन अलमेडा, फ्रान्सिस डिसोजा, विल्यम सालढाणा, रुजाय रोड्रिंक्स, जहॉंन नरहोना,सौ मारसेलिन डीसोजा,सौ कुसुमारी फर्नांडिस,अनमारी डीसोजा,रिचर्ड डिसिल्वा,आगोस्तीन फर्नांडिस,जासील लोबो,ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,नगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर तसेच ठेवीदार,कर्जदार,गुंतवणूकदार व सभासद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मिस्सा बलिदान,धार्मिक विधी बिशप ऑलिवीन बरेटो व फादर यांच्या उपस्थितीत पार पडला.दरम्यान बँकेचा प्रवास चित्रफीत द्वारे दाखवण्यात आला.तसेच याप्रसंगी मुंबई व गोव्यातील कलाकारांचा गायनाचा व नृत्याचा सदाबहार कलाविष्कार सादर करण्यात आला.यावेळी फादर जॉन सालढाना यांचा सत्कार चेअरमन डोन्टस यांनी केला.
या प्रसंगी फादर जॉन सालढाना म्हणाले,मला अभिमान वाटतो,जी पतसंस्था आम्ही एका छोट्याश्या खोलित सुरू केली.त्याच मोठा वृक्ष झाला.हे पाहून सर्वांचे आभार मानतो,या संस्थेची भरभरट झाली,या पतसंस्थेचा आमच्या व इतर समाजाला पुष्कळ फायदा झाला आहे.वाहन,गृह,घर उभारणी,सोने तारण या योजनेतुन पतसंस्थेने समाजसेवा केली आहे. २५ वर्षात ही संस्था १०० कोटी भांडवल जमा करू शकेल,हे त्यांनी शक्य करून दाखवले आहे,असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

\