केवळ पाहणीचा दिखावा नको…भरपाई दया…

87
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अन्यथा आंदोलन;शेतकरी संघटनेचा दाणोलीत ईशारा…

आंबोली ता.०३: भात नुकसानी पाहणीचा केवळ दिखावा नको तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.अन्यथा शासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यानी दिला.दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पंचक्रोशीतील शेतक-यांच्या बैठकीत केसरकर बोलत होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत , केसरी सरपंच देवेंद्र सावंत, ओवळीये माजी सरपंच बळी सावंत , कमलाकर पांगम , संजय सोमण , अंकुश सावंत , हनुमंत सावंत , विठू गोरे , रामचंद्र सावंत , दाजी सावंत , मदन परब , महादेव सावंत , अमोल केसरकर , बाबी खामकर , प्रसन्ना नार्वेकर , प्रसाद परांजपे , दादा कोरगावकर , अंकुश नाईक, रघुनाथ सावंत आदी दाणोली पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी राघोजी सावंत यानी या भात शेतीच्या नुकसान भरपाईसाठी लागणारया कागद पत्रांची क्लिष्ट प्रक्रीया पाहता ‘भिक नको पण कुत्रा आवर’ अशी अवस्था होत आहे त्यामूळे शेतकरयाना तात्काळ भरपाई मिळण्यासाठी शासनाने त्वरित ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.बळीराम सावंत आणि देवेंद्र सावंत यानी कृषि खात्याने भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत पुर्ण करावे आणि योग्य व तात्काळ भरपाईसाठी लोकप्रतिनिधीनी शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी केली यावेळी कमलाकर पांगम , दादा कोरगावकर , अमोल केसरकर यानीही शेतकरयाच्या नुकसानीबाबत प्रश्न व समस्या मांडल्या.

\