शिवसेना नेहमीच शेतक-यांसोबत राहील…

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आदीत्य ठाकरेंचा विश्वास;तळवडे येथे भातनुकसानीची केली पाहणी…

सावंतवाडी ता.०३:

शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांसोबत राहिली असून यापुढेही ती शेतकऱ्यां सोबतचं राहील,अशी ग्वाही युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तळवडे येथे दिली.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री.ठाकरे आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी तळवडे येथे शेतकऱ्यांशी संवाद सादत नुकसान झालेल्या भातशेतीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
ते म्हणाले शेतकऱ्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने उभे राहणे गरजेचे आहे झालेली नुकसानी ही भयंकर असून संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देण्यासाठी शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत राहील व लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करेल असे त्यांनी सांगत उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत आमदार वैभव नाईक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते तालुकाप्रमुख रूपेश राऊळ चंद्रकांत कासार आधी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

\