मच्छिमार बांधवांना नक्कीच न्याय देऊ…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महादेव जानकर; लायसन,जाळी खरेदी पावती बाबत अटी शिथिल करण्याचे दिले आदेश…

वेंगुर्ले : ता.३
वेंगुर्ले तालुक्यातील निवती, मांडविखाडी, वेंगुर्ले बंदर, उभादांडा येथील मच्छिमारांची महाराष्ट्र राज्य मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज भेट घेतली. क्यार वादळामुळे किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवानी झालेली नुकसानी दाखवणे शक्य नसल्याने सर्वांना सरसकट नुकसानी द्यावी अशी मागणी केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आज मंत्री महादेव जानकर यांनी वेंगुर्ले तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करा असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे यांच्या लायसन व जाळी खरेदी पावतीबाबत अटी शिथिल कराव्यात असे आदेश मंत्री जानकर यांनी मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांना दिले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई, जि.प. सदस्य दादा कुबल, मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाबी रेडकर, दाजी खोबरेकर, गणपत तोडणकर, सुधाकर वेंगुर्लेकर, मनवेल फर्नांडिस, निलेश सामंत, नाथा मडवळ, प्रसाद पाटकर, विजय ठाकूर, विकास गवंडे, गुरुप्रसाद चव्हाण, गणेश मच्छिमार सोसायटी चेअरमन कमलेश मेथर, प्रल्हाद मेथर, हेमंत खवणेकर, विक्रम खवणेकर, टी डी मेथर, आबा कोचरेकर, नागेश सारंग यांनी चर्चा करून आपले म्हणणे मांडले.

\