वेंगुर्ले : ता.३
कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांनी आज तळवडे,होडावडे, व तुळस गावात परतीच्या पावसामुळे नुकसानी झालेल्या भातशेतीची पहाणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रवीण लोकरे, म्हात्रे, वेंगुर्ले कृषी अधिकारी कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्रीमती उमा पाटील, विस्तार अधिकारी केरवडेकर, मंडळ अधिकारी जाधव, राऊळ,कृषी पर्यवेक्षक केसरकर, कृषी सहाय्यक खडपकर, रेडकर, तुळस तलाठी पाटोळे व तिनही गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुळस सरपंच शंकर घारे, संतोष शेटकर, आप्पा परब, विनय गोरे यांच्या विनंतीवरून आयुक्तांनी ग्रा.पं.तुळस व काथ्या कारखान्यास भेट दिली, व परिस्थितीचा आढाव घेतला. काथ्या कारखान्यातील महीला कामगारांनी आयुक्तांचे आरक्षण केले. यावेळी संचालक सावंत यांनी कारखान्यासंबंधी माहिती दिली. तसेच आयुक्तांनी नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.