ओला दुष्काळ, भातशेती कर्जमाफी, मश्चिमारांना उदरनिर्वाह भत्ता दया

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसेना शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता.४: क्यार वादळामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहिर करा. तसेच भातशेतीसाठी घेतलेले 80 कोटिंचे कर्ज माफ करा. 1 ऑगस्ट पासून मश्चिमार मासेमारिसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मश्चिमारांना सानुग्रह अनुदान जाहिर करावे, अशी मागणी सोमवारी शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अण्णा केसरकर यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

\