सिंधुदुर्गनगरी ; दि: ४ : पूर्वमध्य अरबी महा चक्रीवादळ तयार झाल्याची सूचना प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिली आहे. महा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मच्छिमारांनी दिनांक 5 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये मासेमारीसाठी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये. तसेच पश्चिम मध्य अरबी समुद्रात दिनांक 5 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत व पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि लगतच्या पश्चिम अरबी समुद्रात दिनांक 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आल्या आहेत. या काळात समुद्र खबळलेला राहणार असून मोठ्या लाटा उसळणार आहेत. तरी या पार्श्वभूमिवर मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. कोणताही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षास तातडीने संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शुभांगी साठे यांनी केले आहे.
मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES