सोशल मीडियावर राष्ट्रवादीची बदनामी करणार्‍यावर कारवाई करा…

78
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ येथील युवकावर आरोप;पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी…

कुडाळ.ता,०४ : व्हाट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाची बदनामी करणाऱ्या संबंधित युवकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ राष्ट्रवादीच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असलेला एक व्हिडिओ काही युवकांकडून प्रसारित करण्यात आला आहे.यात कुडाळातील एका युवकांचा मोठा सहभाग आहे.त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे यात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री. बाळा कनयाळकर ,कुडाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भास्कर परब,प्रसाद पोईपकर ,साबा पाटकर,आत्माराम ओटवणेकर,कृष्णा बिबवणेकर ,राजन वराडकर,आनंद आकेरकर अन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

\