स्वयंपाकिंचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

2

शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी

सिंधुदुर्ंगनरी ता.०४:
शालेय पोषण आहार अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी महिलांच्या विविध प्रशांवर आवाज उठविण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील स्वयंपाकि महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दुपारी दीड वाजता मोर्चा जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धडकला.
सिंधुदुर्ग जिल्हा शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्या अध्यक्षा कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली ओरोस रवळनाथ मंदिर येथून हा मोर्चा निघाला. यावेळी विविध प्रकारच्या घोषणांनी जिल्हा मुख्यालय परिसर दणानून गेला. यावेळी उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत यांच्यासह जिल्हा व तालुकास्तर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याशी संघटनेची सकारात्मक चर्चा झाली.

7

4