Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अध्यक्षपदी बाबली वायंगणकर तर सचिवपदी मनोहर पडते यांची निवड
वेंगुर्ले : ता.४
वेंगुर्ले तालुका सेवानिवृत्त ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी -विस्तार अधिकारी या संघटनेच्या अध्यक्षपदी बाबली वायंगणकर यांची तर सचिवपदी मनोहर पडते यांची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ले तालुका सेवानिवृत्त ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी -विस्तार अधिकारी या संघटनेची सभा नुकतीच वेंगुर्लेत पार पडली. ही संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश व महत्व तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेची गरज असल्याचे ग्रामविकास अधिकारी श्री. वाटवे यांनी सांगितले. तसेच या संघटनेच्या शाखा जिल्हास्तरावर अशा प्रकारे संघटना स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिह्यातील सर्वच तालुक्यामध्ये संघटना स्थापना करण्यात येत आहेत. वेंगुर्लेतील या संघटनेच्या सदस्यपदी गुरूनाथ केशव जोशी, नामदेव शंभा भुते, एस. डी. फर्नांडीस, व्ही. जे. परब, विठ्ठल अनंत वाटवे, एस. व्ही. आईर यांची निवड करण्यात आली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.