गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेडगेंचे अखेर निधन…

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव-उपवडेतील घटना;गोवा-बांबुळी येथे सुरू होते उपचार…

कुडाळ ता.०४:
गवारेडयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माणगाव येथील सुभाष शेडगे यांची अखेर उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.त्यांच्यावर गेले दीड महिने गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते.मात्र काल सकाळी त्यांचे निधन झाले.दरम्यान वैभव नाईक यांना याबाबतची माहिती मिळताच कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी तातडीची मदत म्हणून वनविभागाकडून कुटुंबियांना ५ लाखाची मदत देण्यात आली.
        माणगाव खोऱ्यातील उपवडेया गावात राहणाऱ्या शेडगे यांच्यावर चतुर्थीच्या सातव्या दिवशी गवारेड्याने हल्ला केला होता.यात ते गंभीर जखमी झाले होते.तब्बल दिड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान उपचार सुरू असतानाच काल सकाळी त्यांची प्राणजोत मालवली.
\