सावंतवाडी ता.०४:
तालुक्यातील सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवतांचा तीसाल गावभेट आणि कौलप्रसादाचा धार्मिक कार्यक्रम आज मोठ्या थाटात संपन्न झाला.अवसारी तरंगकाठ्यांसह पायी चालत हा प्रवास तीन दिवसाहून अधिक काळ सुरू होता.
यावेळी सातार्डा गावातील रायाचे पेड ते बाजारवाडीतून अवसारि देवतांनी भाविकांना कौल दिला.हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.सातार्डा रवळनाथ पंचायतनाच्या जत्ररेपूर्वी या कार्यक्रमांमध्ये दर तीन वर्षांनी देवतांच्या तरंग काठीची गावभेट आणि कौल प्रसाद होतो.अवसारी श्री देव रवळनाथ,श्री देवी माऊली आणि भूतनाथ देवतांची तरंग काठी गावातील भटवाडी पेळपवाडी आणि रायाचे पेड याठिकाणी निवासासाठी जातात त्यानंतरही तरंगकाठी पंचायतनाच्या श्री देव महादेव मंदिरामध्ये देऊळवाडी येथे विसावते.जत्रात्सवामध्ये या तरंंगकाठ्या दर्शनासाठी ठेवल्या गेल्या जातात.
यंदा जत्रोत्सव ११ नोव्हेंबरला होत आहे.परंतु हा गाव भेट आणि कौल प्रसादाचा उत्सव दर तीन वर्षांनी होत. यंदा या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.मंदिरातून निघालेल्या या पंचायतनाच्या देवतांची तरंग काठ्या भटवाडी मध्ये केळकर भटजी यांच्या निवासस्थानी विसावल्यानंतर पेळपकरवाडी येथे पेळपकर भटजी यांच्या निवासस्थानी दुसऱ्यादिवशी वस्ती करून त्यानंतर रायाचे पेड येथील प्रभू यांच्या निवासस्थानी विसावलेल्या होत्या तरंग काठीने अवसारी देव-देवता परतीच्या प्रवासासाठी रायाचे पेड येथून निघाली सर्व देवतांची तरंगे अवसारासह प्रथम केरकरवाडी येथे आल्या त्यानंतर बाजारपेठ व बाजारातून पाटो पुलावरून श्री देव महादेव मंदिरा पर्यंत गेले .या दरम्यान देवतांच्या पुर्वापार चालत आलेल्या
पायवाटा मोकळ्या केल्या गेल्या होत्या ठिकठिकाणी कौल प्रसादासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वाटेवर शेणाने सारवून रांगोळी व विद्युतरोषणाई सह सजावट केली गेली होती पर्यावरण पूरक फटाक्यांची आतषबाजी नंतर या अवसारि देवतांचे स्वागत केले गेले यावेळी कौल प्रसाद घेण्यासाठी गावच्या माहेरवाशिणीनी मोठी गर्दी केली होती त्या सर्वजणी श्री देवी माऊली ची ओटी भरण्यापासून ते कौल घेण्यापर्यंत आतूर झाल्या होत्या देवतांची तरंगकाठी मानकरी यांच्यासह ठिकठिकाणी थांबून कौल दिला व नंतर श्री देव महादेव मंदिरासमोर विसावली हा धार्मिक कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू राहिला सातार्डा गाव हे महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक आहे परंतू गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने गोव्याशी सलोख्याचे व नातेसंबंध जुळले गेले आहेत त्यामुळे या उत्सवास या राज्यातील भाविकांची मोठी गर्दी होती