सावंतवाडी मोती तलावाच्या फुटपाथवर आढळला अज्ञाताचा मृतदेह…

2

सावंतवाडी ता.०५:

येथील मोती तलावाच्या फुटपाथवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळी सावंतवाडी पोलिस दाखल झाले आहेत.दरम्यान अध्याप त्याची ओळख पटू शकली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की,येथील विश्रांती हॉटेल समोर एक अज्ञात इसम पडलेल्या अवस्थेत नागरिकांच्या निदर्शनास आला.दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांना दिली.त्यानुसार पोलीस सखाराम भोई व प्रवीण सापळे यांनी घटनास्थळी धाव घेत ओळख पटविण्याचे कार्य सुरू केले आहे.

4

4