अभिनय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

2
वेंगुर्ले : ता.५
आसोली हायस्कूलमध्ये ३ व ४ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन आसोली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर यांच्या हस्ते झाले.
      या कार्यशाळेत सुप्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते आनंद कारेकर, जयवंत भालेकर, अभिनेत्री शितल माने, नाट्य निर्माते राकेश शेळके यांनी एकाग्रता, स्मरणशक्ती, खेळ, लव्हगेम, कल्पनाशक्ती, संगीतावर हालचाली, तालबद्धता, अभिनयातीलनवरस, मुकाभिनय, अभिनय यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी माजी विद्यार्थी झिलू घाडी, अमित गावडे, शामसुंदर गावडे, शेरके, संस्था अध्यक्ष उदय धुरी, विजय धुरी, संजय गावडे, मुख्याध्यापक विशाखा वेंगुर्लेकर, विष्णू रेडकर, एस.एल.जाधव आदी उपस्थित होते. तर कार्यशाळेमध्ये आसोली हायस्कूल, आसोली प्राथमिक शाळा, न्हैचिआड, खालचे अणसूर, मोचेमाड, सोन्सूरे येथील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीव्ही मालिकांमधून व नाटकातून देशपरदेशी दौरे करणारे जगदीश गावडे यांनी केले.

3

4