करुळ येथे बिबट्याची दहशत….

98
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली; बंदोबस्त करण्याची मागणी….

वैभववाडी ता,०५:
करुळ दिंडवणेवाडी येथील भरवस्तीत सलग सहा दिवस ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. वाडीत बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे भरदिवसाही वस्तीत फिरणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा  बंदोबस्त करून ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी नागरीकामधून केली जात आहे.
     गेल्या पाच दिवसापासून वाडीतील रहीवाशी व ट्रक चालक प्रदिप पडवळ आणि बिबट्या यांची गाठभेट कायम घडत आहे. तसेच वाडीतील महीलांनाही बिबट्या दृष्टीस पडत आहे. वाडीतील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ले केले आहेत. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत बिबट्याचे दर्शन सऱ्हास घडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. या वाडीतील बरीच घरे बंद आहेत. अशा बंद घराच्या अंगणात बिबट्या मुक्त संचार करताना ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत आहे.
\