आमदार नाईक पुन्हा निवडून आले हे दुर्देव…

2

नीलेश राणे ; नाईकांची शेवटची टर्म करायचे भाजपने ठरवलंय…

मालवण, ता. ५ :
वैभव नाईक यांच्या विरोधात या मतदार संघात नाराजी होती. कमळ चिन्ह असते तर २५ हजारांनी त्यांचा पराभव निश्‍चित होता. आमदार म्हणून प्रत्येक गोष्टीत ते बोगस ठरले. आमदार म्हणून त्यांचा कोणताही प्रभाव नाही. एकही विषय त्यांनी सोडविलेला नाही. पाच वर्षे फुकट त्या नेत्याची नव्हे तर मतदारांची, त्या भागाची जातात. पण दुर्दैव आहे वैभव नाईक पुन्हा निवडून आले. मात्र आता त्यांची ही शेवटची टर्म करायची असे भाजपने ठरवले आहे असे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
     येथील भाजपच्या कार्यालयात प्रथमच आलेल्या माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, कृष्णनाथ तांडेल, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, दीपक पाटकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
     कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. राणे म्हणाले, राष्ट्रीय पक्षात आल्याचे समाधान आहे. काही कारणांमुळे विधानसभा निवडणुकीपासून लांब होतो. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी शर्यत होती. यात शर्यत चांगली होती मात्र शर्यत जिंकण्यासाठी उतरायला हवे. माझ्याबाबत अनेक अफवा पसरविण्याचे काम झाले. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश झाल्याने सक्रिय झालो आहे. नारायण राणे हेच आमचे नेते आहेत. त्यामुळे यापुढे त्यांच्याच आदेशाने पक्षाचे काम चालणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्पर्धा करायची असेल तर ती विरोधकांशी करावी. आपआपसात स्पर्धा, गटातटाचे राजकारण करू नका. भाजप हा माझा शेवटचा स्टॉप असून यापुढे मरेपर्यत भाजप पक्षाचेच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
     भाजपचे कुटुंब आता मोठे झाले आहे. सर्वजण कुटुंब म्हणून काम करणार आहोत. कणकवली मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने बेईमानी केली आणि त्या पक्षात सगळे बेईमानच भरले आहेत. संघटना बांधणी हे रोजचे काम आहे. मालवणातील माझा वावर होता तो आता वाढविणार आहे. मधल्या काळात मी येथे आलो नाही. मात्र आता पुन्हा असे घडू नये म्हणून आठवड्यातील तीन दिवस मालवणात राहून सहकार्‍यांना घेऊन भाजप पक्ष जोमाने वाढविणार आहे.
     राज्यात सत्ता स्थापनेवरून जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी हे सत्ता आणतील. राज्यात महायुतीचीच सत्ता असेल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

3

4