सिंधुदुर्गात होणार रक्तदात्यांचे महासंमेल

2

बैठकीत निर्णय;रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन

बांदा.ता,०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी व रक्तदान चळवळ अधिक कार्यक्षम व्हावी या उद्देशाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाहिले रक्तदान महासंमेलन आयोजित करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान क्षेत्रात कार्यरत असलेल्या रक्तदात्यांनी घेतला आहे. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात नुकतीच यासंदर्भात बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्ह्यातील रक्तदान चळवळ, नियमित रक्तदात्याना प्रोत्साहन देणे, जिल्ह्यातील आरोग्य विषयक समस्यांना वाचा फोडणे, रक्तदान समस्या, रक्तपुरवठा यंत्रणा, रक्तपेढीच्या समस्या व मर्यादा, थँलेसेमिया बाबत जागृती, देहदान जागृती याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील २५ हुन अधिक रक्तदाते उपस्थित होते.
सुरुवातीला या संमेलनाची का आवश्यकता आहे, याबाबत प्रकाश तेंडोलकर यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व रक्तदात्याची एक संघटना असावी, जिह्यातील किंवा अन्य कुठल्याही ठिकाणावरील रुग्ण रक्त न मिळाल्याने मृत्यू होऊ नये यासाठी संघटना महत्वाची आहे.
जिल्ह्यात तालुकावार रक्तदाते यांची रक्त गटानुसार माहिती संकलित करणे, गोव्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता संघटना अधिकृत नोंदणी करून सर्व सदस्यांना ओळखपत्र देणे, जिल्ह्यात नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांचा सत्कार करणे, जास्तीत जास्त युवा पिढीला रक्तदान करण्यासाठी जागृत करणे व त्यांना या कार्यात सामावून घेणे याबाबत निर्णय घेण्यात आले.
यासाठी तालुकावार जबाबदारी निश्चित करण्यात आली. यामध्ये दोडामार्ग तालुक्यासाठी अरुण गवस, गजानन भणगे, मकरंद करमळकर, सावंतवाडी तालुक्यासाठी बाबली गवंडे, निलेश मोरजकर, श्रीपाद शेणई, सुप्रिया मोडक, कुडाळ तालुक्यासाठी कल्पिता साटेलकर, भाग्यश्री भोसले, रविंद्र गावडे, सचिन गुंड, वेंगुर्ले तालुक्यासाठी अमित आमोणकर, ऍलिस्टर ब्रिटो, मयुरेश पेडणेकर, मालवण तालुक्यासाठी किशोर नाचणोलकर, गुरुनाथ माने, सिनसॉन फर्नांडिस, कणकवली तालुक्यासाठी विजय चव्हाण, ऋषिकेश जाधव, जयदीप वावळीये, देवगड तालुक्यासाठी रविकांत चांदोसकर, विजय जोशी, महेश शिरोडकर, वैभववाडी तालुक्यासाठी प्रकाश तेंडोलकर, नागेश सोमजी यांची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला किशोर नाचणोलकर (मालवण), जयकुमार साटेलकर (मुंबई),
जनार्दन एडगे (निळेली), कल्पिता साटेलकर (कुडाळ), विजयकुमार जोशी (देवगड), प्रथमेश परब (मालवण), उद्धव गोरे (देवगड), पंढरीनाथ आचरेकर (देवगड), संतोष मुणगेकर (देवगड), रविकांत चांदोसकर (देवगड), प्रथमेश पालयेकर (वेंगुर्ला), मयुरेश पेडणेकर (वेंगुर्ला), अमित आमोणकर (वेंगुर्ला), श्रीपाद शेणई (सावंतवाडी), रविंद्र गावडे (कुडाळ), लिलाधर सोमजी (कुडाळ), शैलेश गवस (बांदा), निलेश मोरजकर (बांदा), महेश शिरोडकर (शिरगाव), प्रकाश तेंडोलकर (बांदा) आदी उपस्थित होते.

13

4