जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उदय खानोलकर

2

सिंधुदुर्गनगरी ता.०६: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी उदय खानोलकर तर उपाध्यक्षपदी सीताराम तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदाशिव सावंत व दिनेश देसाई यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी सहकार अधिकारी श्रीमती एस. ए.भोगले यांचे अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.
माजी अध्यक्ष विनायक पिंगुळकर यांनी खानोलकर यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवले त्याला सी.डी.परब यांनी अनुमोदन दिले.तर तावडे यांचे उपाध्यक्षपदासाठी मनीषा देसाई यांनी नाव सुचविले त्याला संजय म्हापसेकर यांनी अनुमोदन दिले.यावेळी बोलताना खानोलकर व तावडे यांनी बिनविरोध निवडीबद्दल सर्व संचालकांचे आभार मानून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संचालक सर्वश्री सूरज देसाई, दिनेश देसाई, मनीष राणे, जे.डी.राणे, बाळकृष्ण नेरूरकर, विठ्ठल मलांडकर, प्रकाश जाधव, मधुकर राठोड, श्रीमती अपूर्वा मराठे संस्थेचे सचिव – विजय अंदुरलेकर, कर्मचारी- संतोष रावले,सचिन सावंत, तुकाराम शेडगे वगैरे उपस्थित होते.या निवडी बद्द्ल खानोलकर व तावडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

2

4