कृषि समिती सभेत रणजीत देसाई यांची मागणी….
सिंधुदुर्गनगरी ता 6 :
5 नोव्हेंबर पर्यंत जेमतेम 20 हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर हे पंचनामे करण्याची मुदत 6 नोव्हेंबर पर्यंत आहे. एका दिवसात उर्वरित पंचनामे पूर्ण होवू शकत नाही. त्यामुळे भातपिक नुकसानीचे पंचनामे करण्याची मुदत वाढवून दया. अन्यथा सरसकट नुकसानी जाहिर करा, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी कृषि समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरून केली.
जिल्हा परिषदेच्या कृषि समितीची तहकूब सभा बुधवारी बॅ नाथ पै सभागृहात सभापती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाचे कृषि अधिकारी एस एम म्हेत्रे, सदस्य प्रीतेश राऊळ, अमरसेन सावंत, अनुप्रिती खोचरे, सायली सावंत, कृषि अधिकारी संजय गोसावी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.