खड्डे बुजवा अन्यथा… श्रद्धांजली आंदोलन…

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

हेमंत मराठे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा…

सावंतवाडी.ता,०६:

मळगाव – निरवडे -मळेवाड या रस्त्यावर खड्ड्याचे जाळे पसरले आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.तसेच अपघाती रुग्ण व प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कसरतीचे होत असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मराठे यांनी मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर असल्याने या मार्गावर ज्याठिकाणी मोठे खड्डे पडून रस्ता पूर्णपणे खराब झालेला अशा ठिकाणी हॉट मिक्सिंगचा पूर्वीचा एक कोट (थर) मारून  येत्या आठ दिवसात योग्य प्रकारे कार्यवाही करावी.
ते शक्य नसल्यास पडलेले खड्डे डांबराने बुजवावेत अन्यथा आपण १५ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात किंवा आपल्या कार्यालयासमोर भावपूर्ण श्रद्धांजली उपोषण छेडणार असल्याचे निवेदन मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागला दिले आहे.

\