शासकीय जमिनी कसणा-या शेतक-यांना सुध्दा भरपाई द्या……

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जयेंद्र परूळेकर:केसरकर यांची पालकमंत्र्यांचा बैठकीत मागणी…..

सावंतवाडी ता.०६:

अवकाळी नुकसान भरपाई देताना सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी. हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई देण्यात यावी,तसेच ही मदत देताना आकारीपड व कबुलायतदार गावकर आदी जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत विचार व्हावा,अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे आयोजित पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे,अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे दिली.येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे सरकार कडून नुकसान भरपाई देण्यात,यावी तसेच २५ हजार हेक्टरी नुकसान भरपाई आहे.१५ हजार रुपये अनुदान पुनर्लागवडीसाठी देण्यात,यावे अशी मागणी या बैठकीत केली आहे.
यात कबुलायतदार गावकर आणी आकारीपड शासकीय जमिनी असणाऱ्यांना सुद्धा या नुकसानभरपाईचा लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी आहे असे परूळेकर यांनी सांगितले.

\