बाहेरचावाडा येथे भरवस्तीत अजगर सापडला…

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: शहरातील करोलवाडा येथे भरवस्तीत आज (६ नोव्हेंबर) सायंकाळी ६.०० वाजता तब्बल सोळा फूट अजगर आढळून आला.माजगाव येथे भातशेतीत भला मोठा अजगर सापडल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे.
करोल वाडा येथील रईस रियाज शेख यांच्या हा अजगर प्रथम दृष्टीस पडला.मोहम्मद अरिफ, अब्दुल रहमान करोल आणि असिफ सारंग फय्याज करोल यांनी या अजगराला पकडून सर्पमित्र तुषार विचारे यांना पाचारण केले.विचारे यांनी या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.भरवस्तीत एवढा मोठा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनच दिवसांपूर्वी सावंतवाडीतील मोती तलावाकाठी भर रस्त्यावर मगर आढळून आली होती.

\