वाफोली येथे जेसीबी पलटी:सुदैवाने जीवितहानी नाही…

79
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.०६:
बांदा-दाणोली रस्त्यावर वाफोली धरणानजिक अवजड वळणावर जेसीबी उलटून अपघातग्रस्त झाला. आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दैव बलवत्तर म्हणून जेसीबी चालक बचावला. जखमी चालकाला घटनास्थळी उपस्थितांनी बाहेर काढले व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या जेसीबीला अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे जेसीबी रस्त्याच्या कडेला उलटला. वाफोली धरणाच्या सांडव्याजवळ मुख्य रस्त्यावर धोकादायक वळण असून वाहन चालकांना वाहन हाकताना कसरत करावी लागते. त्यातच या वळणावर धरणाच्या ओवर फ्लो पाण्यासाठी मोरी बांधण्यात आली आहे व याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने हे वळण सध्या धोकादायक ठरत आहे. सुदैवाने मोरीच्या पलिकडे जावून हा जेसीबी पलटी झाल्यामुळे चालकाचे प्राण वाचले. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. या मार्गातून रहदारीही मोठ्या प्रमाणात असल्याने लहान मोठ्या अपघाताची मालिकाच सुरूच आहे. चालकाला या अपघातात किरकोळ दुखापत झाली.

\