दोडामार्ग-गोव्यात विलीनीकरणा मागच्या भावना समजून घ्या…

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मंगेश तळवणेकर; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “त्या ” युवकांचे आंदोलन…

दोडामार्ग ता.०७:
दोडामार्ग तालुक्याचे गोव्यात विलीनीकरण करा,या मागणी मागच्या तेथील युवकांच्या भावना जाणून घ्या,व नंतरच त्यांना धमकी द्या,असा टोला माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी आज येथे लगावला.तालुक्यातील काही युवकांनी पुढे येऊन दोडामार्ग गोव्यात विलीनीकरण करा,या मागणीसाठी आंदोलन केले होते.दरम्यान यासंदर्भात आयोजित बैठकीत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन संबंधित युवकांना दमदाटी केली होती.मात्र हा सर्व प्रकार चुकीचा आहे,असे श्री.तळवणेकर यांनी सांगितले.याबाबत त्यांनी आज प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे, दोडामार्ग तालुका हा गोव्याच्या लगत आहे.त्यामुळे येथील वीस हजाराहून अधिक युवक-युवतींना गोव्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.चांगल्या वैद्यकीय सुविधा सुद्धा त्यांच्यामुळेच उपलब्ध झाल्या आहेत.मात्र दोडामार्ग विकसित करण्यासाठी राज्य शासन व सिंधुदुर्ग जिल्हा कमी पडत असल्यामुळे युवकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.या विषयाकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिला पाहिजे,यासाठीच त्यांचा हा आक्रोश आहे.याबाबतची माहिती त्यांनी मला आयोजित बैठकीत दिली आहे असे,श्री.तळवणेकर यांनी म्हटले आहे.
त्यामुळे दोडामार्ग गोव्यात विलीनीकरण करा,अशी मागणी करणाऱ्या “त्या” युवकांच्या भावना जाणून घ्या,त्यांना दमदाटी करण्यापेक्षा तुमच्या नेत्यांचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वळवा,व त्यांच्या रोजगार,वैद्यकीय सेवा व इतर सोई सुविधांबाबत असलेल्या मागण्या पूर्ण करा,असे आव्हान श्री.तळवणेकर यांनी शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना केले आहे.
\