सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा पतसंस्थेकडून आर्थिक फसवणूक…

2

ठेवीदारांचा प्रशासनाला घेराव पंधरा तारखेपर्यंत पैसे परत देण्याचा प्रमुखाचे आश्वासन

सावंतवाडी ता.०७: शहरात बस्तान मांडलेल्या एका पतसंस्थेकडून ठेवीदारांची पुन्हा एकदा लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार आज समोर आला आहे.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कार्यालयावर धडक देत प्रमुखाला धारेवर धरले.व आपले पैसे परत करा,अशी मागणी केली.यावेळी या संस्थेच्या प्रमुखाने प्रथम नकार दिला.मात्र हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आपण पंधरा तारखेपर्यंत पैसे परत करू,असे आश्वासन मिळताच ठेवीदारांनी माघार घेतली. दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार आणि निलेश पिंगुळकर यांनी पोलिसांसमोर ठेवीदारांची बाजू मांडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील एका पतसंस्थेत ठेवीदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती.दरम्यान ही रक्कम संबंधित ठेवीदार काढण्यासाठी गेले असतात त्यांना बँकेच्या खात्यात रक्कम मिळाली नाही.तर संस्थेकडून देण्यात आलेले चेक बाउन्स झाल्याचा प्रकार समोर आला.त्यामुळे संबंधित ग्राहकांनी एकत्र येत आज पतसंस्थेच्या कार्यालयात धडक देऊन संस्थेच्या प्रमुखाला धारेवर धरले,दरम्यान हा विषय अधिकच लांबवत राहिल्याने ठेवीदारांनी संबंधित बँकेच्या प्रमुखाला घेऊन सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले.
यावेळी शीतल सावंत,राजेश सावंत,स्वरा चव्हाण,संजू शेटकर,गणेश परब,रामा पेडणेकर,उमेश सावंत,बाळू मोरजकर,विजयश्री गावडे,राघो राऊळ,हर्षदा सातार्डेकर आदी ग्राहक उपस्थित होते.

2

4