Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
श्री देव ईसवटी महापुरुष कला-क्रीडा मंडळाचे आयोजन…
सावंतवाडी ता.०८:
येथील श्री देव ईसवटी महापुरुष कला-क्रीडा मंडळ,सबनीसवाडा यांच्यावतीने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिनांक १० व ११नोव्हेंबर रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
यात दिनांक १० मे रोजी नृत्य व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा खुला गट व बाल गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत.बाल गटासाठी बारा वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रत्येक गटात फक्त प्रथम येणाऱ्या पंधरा स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे.या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी ७३५०४६८६५५ किंवा ७०३८१६२०३२ या नंबरशी संपर्क साधावा.तसेच ११ नोव्हेंबर रोजी श्री माऊली कलामंच सोनुर्ली यांचा नृत्याविष्कारांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.