नगराध्यक्षांची खुर्ची अडगळीत टाकल्याचा अन्नपुर्णा कोरगावकरांवर आरोप…

157
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक;सावंतवाडी पालिकेत खुर्चीवरून राजकारण रंगणार…..

सावंतवाडी ता.०९:
येथील पालिकेत खुर्चीचे राजकारण रंगले आहे. प्रभारी नगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्षाची खुर्ची अडगळीत टाकून आपली वेगळी खुर्ची त्याठिकाणी लावली.हा सर्व प्रकार म्हणजे त्या खुर्चीचा अपमान केल्यासारखा आहे. असा आरोप पालिकेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला.
दरम्यान जोपर्यंत त्या ठिकाणी नगराध्यक्षांची खुर्ची आणली जात नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेचे नगरसेवक गप्प बसणार नाही. गेले काही दिवस आम्ही सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही असाही आरोप लोबो यांनी यावेळी केला.सावंतवाडी शहरातील विकास कामासंदर्भात माहिती देण्यासाठी लोबो यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बाबू कुडतरकर आनंद नेवगी सुरेंद्र बांदेकर शुभांगी सुकी भारतीय मोरे आदी उपस्थित होते

यावेळी लोबो म्हणाल्या नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याठिकाणी असलेली त्यांची खुर्ची कोरगावकर यांनी मागच्या खोलीत असलेले अडगळीत टाकली. आपण यावर त्यांना विचारणा केली व ती खुर्ची त्या ठिकाणी आणून पुन्हा ठेवा असे सांगितले परंतु ते कोरगावकर यांनी मान्य केले नाही नगराध्यक्षाच्या खुर्ची बाबत अशाप्रकारे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य नाही त्यामुळे घटना घडल्यापासून आपण नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये पाय ठेवलेला नाही याबाबत मुख्याधिकारी यांचे लक्ष आपण वेधण्याचा प्रयत्न केला पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सौ कोरगावकर यांना खुर्ची न हलवण्याबाबत सांगण्यात आले परंतु त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केला त्यामुळे आम्ही प्रकारांमुळे व्यथित झाला होता सौ कोरगावकर या आमच्या सहकारी आहेत आमच्या गटात आहेत त्यांनी हे सर्व करत असताना आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे होते मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडून तसे झाले नाही. नगराध्यक्ष खुर्ची बाजूला टाकण्याची भूमिका चुकीची आहे त्यामुळे या बाबत योग्य ती भूमिका घ्यावी यासाठी आम्ही सोमवारी मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत त्यानंतर भूमिका जाहीर केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले शहरात झाले करण्यात आलेल्या विकास कामाबाबत त्यांनी माहिती दिली स्विमिंग पूल शिल्पग्राम काझी शहाबुद्दीन हाॅल आदी कामे पुर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले

\