कर्याद नारूर श्री महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबर रोजी…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०९:

कर्याद नारुर येथील श्री.महालक्ष्मी देवस्थानचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने सकाळी महालक्ष्मी देवीची महापूजा, त्या नंतर ओटी भरणे, नवस बोलणे ,व रात्री ११.०० वाजता मंदिरा भोवती ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजी गजरात पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १२.०० वाजता वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने दीपक नारकर यांनी केले आहे.

\