वेंगुर्ले नगर पालिकेचा अनोखा उपक्रम…
वेंगुर्ले ता.९:
यापुर्वी झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये वेंगुर्ले न. प. चा भारतात नववा नंबर आला. त्यामुळे गेल्या तीन वर्षात वेंगुर्ले न. प. ला भरपूर विकास निधी मिळाला. यावर्षीच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणच्या पाहिल्या दोन टप्प्यात वेंगुर्ले न. प. ने चांगले काम केले असल्याने “थ्री स्टार” मानांकन मिळाले आहे. आता फाईव्ह स्टार मानांकन मिळण्यासाठी व वेंगुर्ले न. प. देशात पाहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी या तीसऱ्या टप्यात वेंगुर्ले शहरातील नागारिक, स्वच्छता कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी योग्य समन्वय ठेवुन काम करावे असे आवाहन वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तयार केलेल्या “ जिंगल ” (शिर्षक गीत ) प्रसारण प्रसंगी बोलताना केले.
वेंगुर्ले न. प. ने तयार केलेल्या नविन शिर्षक गीताचे प्रसारण न. प. च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुमन निकम, सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी आदी नगरसेवक व न. प. चे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. मात्र न. प. च्या या कार्यक्रमाकडे बऱ्याच नगरसेवकांनी पाठ फिरवली.
चलो रे साथ चलो, स्वच्छता हि आपली जबाबदारी, आम्ही उघडयावर कचरा टाकणार नाहि दुसऱ्याला टाकू देणार नाहि, उघडयावर कचरा टाकु नका आमचे लक्ष आहे तुमच्यावर, आपले शहर स्वच्छ ठेवुया पर्यटनातुन विकास करुया असा संदेश देणाऱ्या या शिर्षक गिताचे यावेळी प्रसारण करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष दिलीप गिरप पुढे म्हणाले की, २०१५ पासुन वेंगुर्ले न. प. स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमात सहभागी आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये यापुर्वी वेंगुर्ले न. प. ला अनेक बक्षिसे मिळाली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात वेंगुर्ले न. प. ला विकास कामांसाठी भरपुर निधीहि मिळाला आहे. यावर्षी या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यात वेंगुर्ले न. प. ला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. आता नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत तीसरा टप्पा होणार आहे या तीसऱ्या टप्यात शहरातील नागरीकांनी, स्वच्छता कर्मचारी व सर्व लोकप्रतिनिधी यांनी योग्य समन्वय ठेवुन काम करावे. व वेंगुर्ले न. प. देशात पाहिल्या पाच नंबर मध्ये येण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.