रूपेश राऊळ यांचा आरोप;आता माघार घेणार नसल्याचा इशारा…
सावंतवाडी ता ०९:
सांगेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमाकांत राऊळ यांच्या विरोधात घेतलेला अविश्वास ठराव प्रशासन व राजकीय दबावाला बळी पडुन घेतल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान या प्रकारामागे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबल अल्मेडा यांचा हात असून याविरोधात आपण योग्य त्या ठिकाणी दाद मागू मात्र आता काही झाले तरी माघार घेणार नाही असा इशारा उपसरपंच राऊळ यांनी दिला आहे .
सांगेली उपसरपंच रमाकांत राऊळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे तो मंजूर करण्यात आला मात्र ही प्रक्रिया प्रशासनाकडून चुकीची राबवण्यात आली यात ग्रामसेवक गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या वर अविश्वास ठराव आणला असा आरोप उपसरपंच राऊळ यांनी केला आहे त्या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली थेट सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर सरपंच उपसरपंच यांना तब्बल दोन वर्षे अविश्वास ठराव आणता येत नाही हा कायदा आहे मात्र कायद्याची कोणताही अभ्यास न करता प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून आपल्यावर एकतर्फी कारवाई केली आहे त्यामुळे आपण आता राजीनामा मागे घेणार नाही तत्पूर्वी गावात वाद नको म्हणून आपण ग्रामसेवकांकडे राजीनामा दिला होता परंतु तो राजीनामा तसाच ठेवून आपल्यावर केवळ सूडबुद्धीने अविश्वास ठराव अन्याला आणि आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केवळ शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रकार झाला असे द्यावी आरोप उपसरपंच राऊळ यांनी केले दरम्यान त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख राऊळ यांनी दिला त्यावेळी चंद्रकांत कासार मायकल डिसोजा बाळा माळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते