Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अन्नपूर्णा कोरगावकर; नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये यायचे नसेल, तर ..तो त्यांचा प्रश्न…
सावंतवाडी ता.०९:
पालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या राजीनाम्यानंतर कोणाचेही हक्क न हिरावता मी कायद्यानुसार नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यामुळे मी कोणाचाही अपमान केला नाही आणि करणार नाही,असा खुलासा तत्कालीन नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष कार्यालयात यावे,की न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.ते सगळ्यांसाठीच खुले असणार आहे,असेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आज पत्रकार परिषदेत अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्ष पद स्वीकारून पदाचा अपमान केला,त्यामुळे आम्ही गेले काही दिवस कार्यालयात जाणे टाळले,असा आरोप केला होता.त्याला सौ.कोरगावकर यांनी ब्रेकिंग मालवणी च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
सौ कोरगावकर पुढे म्हणाल्या,नगराध्यक्ष साळगावकरांसोबत मी काम केले आहे.त्यांची काम करण्याची पद्धत मला चांगल्याप्रकारे माहित आहे.त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर मी योग्यरीत्या पदाची जबाबदारी सांभाळत आहे.असे असताना लोबो यांनी खुर्ची अडगळीत टाकली,असे सांगून पदाचा अवमान केला असे म्हणणे चुकीचे आहे.मी माझ्या कामातून खुर्चीचा आणी साळगावकर यांचा मान व आदर्श कायम राखला आहे.आणि तो यापुढेही राखेन,असे त्यांनी सांगितले. मला सगळ्यांना सोबत घेऊन शहराचा विकास करायचा आहे.त्यामुळे जो पर्यंत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागतं नाही तो पर्यत आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.