समीर कोकरे मृत्यू प्रकरणी चौघां मित्रांची चौकशी

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा/प्रतिनिधी
भालावल-धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्यासोबत पोहायला गेलेल्या इतर चार जणांचे जबाब आज बांदा पोलिसांनी घेतले. मात्र या जबाबांवरून यामध्ये घातपात झाला नसल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.
बांदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा तेथिलच बंधाऱ्यात आपल्या मित्रांसोबत पोहायला गेला होता. यामध्ये वाडीतील एक जण व परुळे येथील दोघे पाहुणे युवक त्याच्या सोबत होते. यातील समीर व वाडीतील मंदार या दोघांना पोहता येत नव्हते.
पोहायला उतरले असता समीर व मंदार दोघे बुडाले. त्यातील मंदारला मित्रांनी पाण्याबरोबर काढले. मात्र समीरला वाचवू शकले नाहीत. समीर बुडल्याने भयभीत झाल्याने मित्रांनी तेथून काढता पाय घेतला व त्याचे कपडे व मोबाईल फेकून दिलेत.
नातेवाईकांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. काल दोघा मित्रांचे जबाब पोलिसांनी घेतले. आज परुळे येथे जाऊन इतर दोन मित्रांचे जबाब बांदा पोलिसांनी घेतले. या जबाबांमध्ये घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शवविच्छेदन अहवालात समीरचा मृत्यू हा पाण्यात बुडुन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी धनगरवाडीत जाऊनही काहींचे जबाब घेतले आहेत. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

\