डोक्यावर झाडाची फांदी कोसळल्यामुळे मोरे येथील प्रकाश कालवणकर जखमी

95
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव/मिलिंद धुरी ता.१०: मोरे येथील लाकूड व्यवसायिक प्रकाश कालवणकर वय ५० यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने ते गंभीर जखमी झाले.हा प्रकार काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यातील खाजगीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्री कालवणकर यांचा लाकूड व्यवसाय आहे.ते काल आपल्या कुंपणातील मालकीचे झाड तोडण्याचे काम करत असताना अचानक त्यांच्या डोक्यावर भली मोठी फांदी कोसळली.यात त्यांना गंभीर दुखापत झाली.श्री.कालवणकर अपघातात जखमी झाल्याचे कळताच माणगाव खोऱ्यातील सर्व लाकूड व्यवसायिकांनी गोवा येथे धाव घेतली.

\