हृदयविकाराच्या झटक्याने कोलगाव येथील युवकाचे निधन

105
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१०: कोलगाव येथील ३३ वर्षीय युवकाचे झोपेतच निधन झाले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.केतन विनायक तेंडुलकर रा.मारुती मंदिर शेजारी,सावंतवाडी असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याला तपासणीसाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु तत्पूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असावा असा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.कोलगाव येथे राहणारा केतन हा पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता.शेजारी लग्न असल्यामुळे तो दोन दिवसांपूर्वी गावात आला होता.दरम्यान काल रात्री लग्नाला जाऊन परत तो घरी झोपला होता.सकाळी घरातील व्यक्ती उठवण्यात गेले असता तो उठला नाही तो बेशुद्ध झाला असेल असा संशय आल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.चार वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

\