चराठे गावाला कायमस्वरूपी वायरमन न मिळाल्यास आंदोलन

124
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांचा इशारा; वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सावंतवाडीत घेराव

सावंतवाडी ता.११:  वारंवार मागणी करून सुद्धा चराठे गावाला वायरमन देण्यात न आल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.आम्हाला तात्काळ वायरमन द्या अन्यथा माघार घेणार नाही,अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी घेतली.तत्पूर्वी त्या ठिकाणी वीज कंपनीचे कोणीच अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अखेर दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात आपण माजगाव व कारिवडे या दोन गावातील वायरमन त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ,त्यानंतर कायम स्वरूपी वायरमन देण्याचा प्रयत्न करतो,असे आश्वासन दिले.परंतु आम्हाला कायमस्वरूपी वायरमन न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला.
यावेळी सरपंच रघुनाथ वाळके उपसरपंच जॉनी फेराव, बाळू परब,मायकल डीसोझा, महादेव गुरव, ओंकार पावसकर ,चित्रा धुरी,प्रकाश बिर्जे,मंगेश धुरी, श्रीधर बोंद्रे, सचिन रेडकर ,पुरुषोत्तम परब, संजय कानसे, राजू कुबल, श्यामसुंदर कुबल आदी उपस्थित होते.

\