बालदिना निमित्त १४ नोव्हेंबर ला ‘वेंगुर्ला आयडॉल २०१९’ चे आयोजन

75
2
Google search engine
Google search engine

आधार फाऊंडेशन आणि वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन

वेंगुर्ले, ता.११: आधार फाऊंडेशन वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालदिना निमित्त गुरुवार १४ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता नगर वाचनालय वेंगुर्ले येथे ‘वेंगुर्ला आयडॉल २०१९’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत ६ वर्षाखालील मुले-मुली आणि ८ वर्षाखालील मुले-मुली असे दोन गट असून प्रत्येक गटात दोन वेगवेगळे विभाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या विभागात स्पर्धकांनी एकपात्री अभिनय, बडबडगीत, संस्कृत श्लोक, कविता, हिंदी-मराठी गाणी तर दुसऱ्या विभागात वेशभूषा, नृत्य यापैकी कोणतीही एक कला सादरीकरण करणे आवश्यक आहे.
सदारीकरणासाठी किमान ३ ते कमाल ५ मिनिटे राहील. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर(९४२२४३४३५६) आणि प्रा. सचिन परुळकर ( ९४२१२३०५३) यांनी केलेलं असून अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी गुरूदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा.