पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पती शंकर तारीला जामीन…

96
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता.११: सावंतवाडी माठेवाडा येथील शंकरप्रसाद तारी हे स्वताच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होते. सोमवारी त्यांना जिल्हा न्यायालयाने सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
संशयित आरोपीच्यावतीने वकील संग्राम देसाई ,वकील अविनाश परब , वकील पंकज आपटे, वकील सुहास साटम यांनी काम पाहिले.
लग्न झाल्यानंतर पत्नीला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, चारित्र्याचा संशय घेणे, तसेच मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शंकरप्रसाद तारी याच्यावर ठेवण्यात आला आहे. २४ एप्रिल ते २ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडलेल्या या प्रकाराबद्दल ३ नोव्हेंबर रोजी दाखल तक्रारीनुसार शंकरप्रसाद तारी याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३०६, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी शंकरप्रसाद याला पोलिसांनी ३ रोजी अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी यांनी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती.
दरम्यान त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणीत त्याला २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

\