आरोंदा स्वप्निल जोशी खून प्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.११: आरोंदा येथील स्वप्नील जोशी खूनप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित दीलीप वासुदेव मोर्जे याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.आरोंदा बाजारपेठेत तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात हा प्रकार घडला होता.याप्रकरणी त्याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली होती.
या बाबत अधिक माहिती अशी की,मयत स्वप्नील जोशी याने तंबाखू देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याचा मित्र दिलीप मोर्जे याने आपल्या हातातील चाकूने जोशी यांच्या छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले होते.यातच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी संशयित दीलीप वासुदेव मोर्जे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पोलिसांनी दिलीप मोर्जे याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले,असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.दरम्यान सोमवारी मोर्जे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा येथील न्यायालयात हजर केले,असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

\